Monday, June 27, 2016

कृष्ण मंदिर

         पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे श्री गोवर्धन गिरिधारी अशा श्री गोपाल कृष्णाचे एक पुरातन व भव्य असे मंदिर आहे.हे मंदिर दुमजली असून दीक्षित कुटुंबाकडे याच्या देखभालीची जबाबदारी आहे. उत्तर भारतातून आयात केलेली हि शालीग्रमाची मनोरम मूर्ती चित्तवेधक आहे.अशाच धाटणीच्या मुर्त्या मोहाडी व शिरवाडे वणी या गांवात आहेत.ह्या प्रत्येक मूर्तीच्या वेगळ्या घडणीमुळे ह्या मूर्ती भारतात एकमेव समजल्या जातात.
        चांदवडमधील श्रीकृष्णाच्या मूर्तीस दोन हात असून उजवा हात कमरेवर ठेवला 

Tuesday, June 7, 2016

रंगमहाल



        रंगमहाल रंगमहालाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाडा अतिशय भव्यदिव्य, भक्कम,सुबक भुईकोट प्रकारातील आहे.कोरीव नक्षीकाम आणि काष्ठशिल्पातील अजोड व अवर्णनीय कलाकुसरीने नटलेला आहे.अशा प्रकाराची कलाकुसरीची जगात मोजकी ठिकाणे आहेत त्यापैकी रंगमहाल एक आहे.सोबतच मजबूत दरवाजा,विशाल सभागृह,उंच मनोरे,आणि खास करून त्याचा राजेशाही रुबाब. 

        चांदवडचा आणि अहिल्यबाई होळकरांचा संबंध तसा जुनाच.मल्हारराव होळकरांची सून म्हणुन वाड्यातला अधिकार, आणि राज्यकर्ती स्त्री म्हणून रंगमहालाची स्वामिनी, असा दुहेरी संबंध.

Friday, June 3, 2016

चंद्रेश्वर महादेव मंदिर


      चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात एका डोंगरकड्यावर श्री  चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन स्थान आहे. 



        त्या स्थानाचा महिमा असा आहे की, भोज राजा विक्रम ह्याची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेनने ह्याने आपली मुलगी चंद्र्कलेचा विवाह राजा विक्रमाशी ह्याच गडावर लावून दिला व ५२ मंदिरांची स्थापना केली. पण मुगलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला व नंतर ह्या परिसराला ग्रहण लागले.